Posts

चंद्र

कधी एकल्याशा रात्री  मनी, गोठलेल्या गात्री  मायेने घाली चंद्र  पांघरूण... चंद्र रमतो गाण्यात  कधी गोष्टीच्या पानात  निंबोणीच्या झाडामागे  निजे चंद्र... चंद्र आभाळी प्रकटे  चुकलेल्या सख्यासम  अन हितगुज करी  मूकपणे… चंद्र उतरे पाण्यात  करी लपंडाव कधी  निथळत किनाऱ्याशी  शांत बसे… चंद्र तिच्याही डोळ्यांत  चंद्र त्याच्याही समोर  त्याने तिने पाहिलेला  चंद्र एक… दमलेल्या पाऊलांना   उध्वस्त जाणिवांना  समंजस चंद्र कसा  कुरवाळितसे… चंद्र इतुक्या जवळ  चंद्र इतुका आपुला  तरी कोसो मैल कसा  दूर चंद्र?  -ऋचा